Friday, 10 June 2016



मुंबई विद्यापीठाने एप्रिल 2016 मध्ये वाणिज्य शाखेच्या 6 व्या सत्राच्या घेतलेल्या परीक्षेचा  निकाल  आज (10/06/2016) जाहीर झाला आहे .

    तृतीय वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Click here for Results )

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ..

                             @dmin
                                                                                         Mr.N.K.
                                                                                          Mr.S.K.

Thursday, 5 May 2016

हिंदू कोड बिल..

२४ फेब्रुवारी १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाविषयी जाणून घेऊया...
स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले.१९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते आणि २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले.स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते.
हे सात घटक खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
३. पोटगी
४. विवाह
५ . घटस्फोट
६. दत्तकविधान
७. अज्ञानत्व व पालकत्व.
हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती
महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच !

भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी ब्राह्मण मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.या बिलाद्वारे बाबासाहेबांनी एक-विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपती मध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती परंतु कडवे हिंदू (ब्राह्मण) नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती."हिंदू धर्मावरील आक्रमण" अशा प्रतिक्रिया देऊन अशा नेत्यांनी प्रखर विरोध केला होता.

स्वतःला उदार मतवादी आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र प्रसाद, वल्लभ पटेल आणि मदन मोहन मालवीय यांनी त्यांचे खरे रूप दाखवून बाबासाहेबांना पराकोटीचा विरोध केला होता. ज्या स्त्रीयांसाठी बाबासाहेब इतकी मेहनत घेत होते ते बिल पारित होऊ नये म्हणून सरोजिनी नायडू उपोषण करणार होत्या. एक अस्पृश्य व्यक्ती हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बऱ्याच तथाकथित हिंदू म्हणवणाऱ्यानी (ब्राह्मणांनी ) बाबासाहेबंविषयी घृणास्पद प्रतिक्रिया दिल्या होत्या इतकेच काय बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही,(म्हणजे विरोधी मत असणाऱयांना देशद्रोही म्हणण्याचे तेव्हापासून चालू आले आहे तर!) हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चे काढले होते. सामाजिक एकता आणि बांधिलकी धाब्यावर बसवून कॉंग्रेसच्या मदतीने एक अस्पृश्य व्यक्तीमुळे  "हिंदू खतरेमे" असे नाक्राश्रू हे हिंदू धर्माचे ठेकेदार काढत होते.तत्कालीन प्रधानमंत्री सामाजिक दबावाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले आणि हे बिल संसदेतून बरखास्त करण्यात आले. बाबासाहेबांनी त्या वेळच्या असलेल्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना / प्रसार माध्यमाना या बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले, परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणी उभे राहू शकले नाही. समाजातील समानतेचे सकारात्म बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा मातीमोल ठरली होती. प्रधानमंत्री नेहरुंच्या या कृत्याची बाबासाहेबांना चीड आली आणि दु:खही झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.... केवढे ते निस्वार्थी कार्य! केवढी ती महानता होती!! आणि किती ते धैर्य!!!म्हणूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले.

पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत.
ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला
होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला.हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-
१) हिंदू विवाह कायदा.
२) हिंदू वारसाहक्क कायदा
३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.
हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय.या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.

बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात, आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.- आचार्य अत्रे.

स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही.काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. (^m^) (^j^) (मनोगते)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sunday, 20 March 2016


महाराष्ट्र आर्थिक पाहणी

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 जतन करण्यासाठी येथे क्लिक करा..

Thursday, 17 March 2016

कल्पना चावला

             आज दिनांक 17 मार्च डॉ कल्पना चावला यांचा  जन्मदिन.
कल्पना चावला ह्या जन्माने भारतीय असलेल्या प्रथम महिला आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेल्या दूसऱ्या भारतीय व्यक्ति होत्या. त्यांचा जन्म 1961 मध्ये हरियानामधील करनाल येथे झाला.कल्पना चावला यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर आईचे नाव संयोगिता चावला. त्यांच्या वडलांचे औद्योगिक वस्तु निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई घर सांभाळायची. त्यांच्या आईला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा होती पण त्यांना कुठे ठावूक होते कि आपली मुलगी संपूर्ण जगात नाव कमावेल! त्यांचे शिक्षण टागोर विद्यालय येथून झाले. 1982 साली त्या अमेरिकेत गेल्या. 1984 साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजीनिरिंग ची मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी मिळविलि. त्यांना अन्तराळविर होण्याच्या स्वप्नाने असे पछाडले होते की त्या वेळेस झालेल्या च्यालेंजर यान अपघाताची चर्चा देखिल त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्यांनी 1986 मध्ये दूसरी मास्टर पदवी आणि 1988 मध्ये कोलेराडो मधून एरोस्पेस मध्ये डॉक्टरेट मिलविलि. 1988 मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओवरसेट मेथड्सच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कोम्प्यूटेशनल फ्लूइड डायनामिक्स मध्ये जागेवरच उभे उड्डाण, कमी अंतरात उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले.   त्यानंतर त्यांना ग्लाइडर्स, सीप्लेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने यांच्या व्यवसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला.1991 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला. त्यांना मार्च 1995 साली तेथे प्रवेश मिळाला. त्यांनंतर त्यांची 1996 मध्ये पहिल्या उड्डानासाठी निवड झाली.  यानात शून्य गुरुत्त्वकर्षणाच्या अवस्थेत असताना  त्या म्हणाल्या "तुमचे अस्तित्व हे तुमच्या हुशारीमुळे असते". त्यांनी अंतराळात 10.67 दशलक्ष किमि प्रवास केला हे अंतर 252 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.त्यांची पाहिली अंतराळ मोहीम 19 नोव्हेंबर 1997 रोजी चालु झाली. त्या 6 अंतराळविरांच्या चमुचा एक भाग होत्या.व  हा चमु कोलंबिया स्पेस शटल एस.टी.एस 87 चे चालन करत होता.  त्यांच्या पहिल्या मोहिमेत त्या 372 तास अंतराळात होत्या. एस.टी.एस-87 मोहिमेदरम्यान त्यांच्यावर नादुरुस्त असलेला स्पार्टन उपग्रह विंस्टन स्कॉट आणि तकाओं दोई यांच्याबरोबर स्पेसवॉक करुन तो दुरुस्त करने ही जबाबदारी होती. या मोहिमेनंतर त्यांना अंतराळ स्थानकावर काम करायचे होते.चावला यांना 2000 साली त्यांच्या दुसऱ्या उड्डानासाठी एस.टी.एस 107 च्या चमु साठी देखिल निवडण्यात आले होते. परंतु ही मोहीम वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलि जात होती. 16 जानेवारी 2003 रोजी चावला दुर्दैवी एस. टी. एस.107 मोहिमेवर जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या.  चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमूला जवळ जवळ 80 प्रयोग करावयाचे असून त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिति, अंतराळविरांचे आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांचा समावेश होता.चावला यांचा मृत्यु 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात पुनरप्रवेश आणि करताना जमिनीवर उतरताना  अपघातात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चमूचा त्यात दुर्दैवी अंत झाला.त्यांना मरणोत्तर  कांग्रेशनल स्पेस चे सन्मान पदक, नासा स्पेस फ्लाइट चे पदक तसेच नासा विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. कल्पना चावला यांच्या नावाने आय.एस.यू. शिष्यवृत्ति फंड हा इंटरनॅशनल स्पेस यूनिवर्सिटी (आय.एस.यू.) द्वारा आंतरराष्ट्रीय अंतराळ शिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2010 साली सुरु करण्यात आला आहे.  द कल्पना चावला मेमोरियल स्कोलरशिप प्रोग्राम भारतीय विद्यार्थी संघटना, टेक्सास विद्यापीठ, अल पासो यांनी 2005 पासून गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.'द कल्पना चावला आउटस्टैंडिंग रीसेंट अलुम्नी अवार्ड' हा कोलाराडो विद्यापीठाने जो 1983 पासून दिला जातो त्याचे नामकरण डॉ चावला यांच्या नावाने केले.  करनाल मध्ये चावला यांच्या जन्मगावि 30 हजार शालेय मुले आणि नागरिक यांनी हातात हात धरून 36.4 किमी लांब मानवी साखळी केलि होती. ही साखळी कल्पना चावला यांच्या नावाने शाहरामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे याच्या समर्थनासाठी होती. 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज निर्माण कमिटी' यात वेगवेगळ्या संस्थांचे  स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तसेच चौतीस शाळांमधील विद्यार्थी यांचा समावेश होता.18 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारने पायाभरणी करतानाचा दगड त्यांच्या स्मृति निमित्त रोवण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ 51826 या अशनिला त्यांचे नाव देण्यात आले.5 फेब्रुवारी 2003 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना-1 हे नाव दिले. त्यानंतर सोडलेल्या उपग्रहाला कल्पना-2 हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार,कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरु केले.नासाने त्यांनी बनविलेल्या सुपर कंप्यूटरला कल्पना चावला यांचे नाव दिले.कल्पना चावला त्यांच्या मित्र आणि सहकर्मी यांच्यात के.सी नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांची आई सांगते कल्पना हि एक वेगळीच मुलगी होती. ती स्व:ताचे केस स्वतःच कापत असे, तीला कधी इस्त्री केलेले कपडे लागत नसत,तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले होते. त्या पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधे अव्वल होत्या त्यांना त्याच कॉलेज ने नोकरी सूध्धा देवू केली होती. त्यांचे भाऊ संजय चावला म्हणतात कि, "माझी बहिण मरण पावलेली नाही तर ती अमर झाली आहे. ती एक आकाशातील कायमचा तारा झालेली आहे आणि तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच आकाशात कायमची राहणार आहे"  त्या या शतकातील काही आदर्शांपैकी एक आहेत त्या सदैव आपल्या नावाशी जणू प्रामाणिकच राहिल्या. त्या आपल्याला त्यांचे धैर्य, जिद्द, चिकाटि, त्यांनी केलेले बलिदान आणि देशाला मिळवून दिलेला अभिमान यासाठी नेहमीच आठवणीत राहतील.
डॉ.कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ मध्ये आपल्या नाशिक मध्ये सुद्धा काही खगोलप्रेमी तरुणांनी एकत्र येवून 'कल्पना युथ फाउंडेशन' या नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे. नवीन अंतराळ मोहिमांबद्दल माहिती देणे, शाळा कॉलेजेस यांमधून व्याख्यान आणि प्रस्तुतीकरण करणे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. दुर्बीण बनविणे, विविध स्पेस क्राफ्टची मॉडेल्स बनविणे, अंतराळ विज्ञानासंबंधीच्या विषयांवर निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेणे, पॉवर पॉइंट स्पर्धा घेणे, आकाशदर्शन करवून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अकाशाबद्दल कुतूहल तयार करणे अशी विविध कामे करते.    युनोच्या आशिया पॅसिफिकच्या अंतराळ शिक्षणाच्या राजदूत अपूर्वा जाखडी ह्या या संस्थेच्या मुख्य सल्लागार असून प्रोफेसर जयदीप शहा, प्रोफेसर भूषण उगले, पवन कदम, हेमंत आढाव, सुशांत राजोळे, विजय वैशंपायन, सारंग शाह, केतकी, मयुरी, दिपक तरवडे, दिपक सोनवणे, सुधाकर नागरगोजे, धनंजय लाखी हे काम बघतात. तसेच संस्थेची  www.kalpanayf.org  या नावाने वेबसाईट देखील आहे. तसेच फेसबुकवर देखीलआहे 'कल्पना वाय एफ' या नावाने पेज देखील आहे.

Wednesday, 16 March 2016

कोणी म्हणेल की

* कोणी म्हणेल की *

कोणी म्हणेल की , मी हरलो कसा इथे . .
तेव्हा जगास सांगा , लढलो कसा इथे !

बांधा खुशाल , माझ्या घरटी उरावरी
कोणास काय चिंता . . रुजलो कसा इथे !

मी पेटलो असा की , वणवाच पेटला !
आकाश फक्त जाणे, विझलो कसा इथे !

मी हासताच फुलल्या सुतकातही कळ्या . .
बागेस ह्या विचारा, हसलो कसा इथे !

ते खोड चंदनाचे झिजले नि संपले . .
गंधात पण पहा ना , उरलो कसा इथे !

                                     अनामिक

Tuesday, 15 March 2016

TYBA Time Table ~6

तृतीय वर्ष सत्र 6 चे परीक्षा वेळापत्रक जतन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Friday, 11 March 2016

TYBA Results 2015


   निकाल पाहण्यासाठी समोर क्लिक करा :- TYBA Results  

Thursday, 10 March 2016

बिक न जाए |

बिक न जाए ,

बिक रहा है पानी,
पवन बिक न जाए ,

बिक गयी है धरती,
गगन बिक न जाए

चाँद पर भी बिकने लगी है जमीं .,
डर है की सूरज की तपन बिक न जाए ,

हर जगह बिकने लगी है स्वार्थ नीति,
डर है की कहीं जमीर बिक न जाए ,

देकर दहॆज ख़रीदा गया है अब दुल्हे को ,
कही उसी के हाथों दुल्हन बिक न जाए ,

हर काम की रिश्वत ले रहे अब ये नेता ,
कही इन्ही के हाथों वतन बिक न जाए ,

सरे आम बिकने लगे अब तो सांसद ,
डर है की कहीं संसद भवन बिक न जाए ,

आदमी मरा तो भी आँखें खुली हुई हैं
डरता है मुर्दा , कहीं कफ़न बिक न जाए।…..

तुम्ही मरताय हळूहळू!

तुम्ही मरताय हळूहळू!

तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

Tuesday, 8 March 2016

काय माहित

आज महिला "दिनी" सुद्धा महिला "दीन" आहे. हा "दीन" पणा कोणत्या दिनी जाईल काय माहित.

 
"All Humans Rights Are Women's Rights"

हे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवने आज अभिप्रेत आहे.
  तुम्हाला काय वाटत.

श्रीमंत विद्यार्थी.......


              शाळेने पत्रक काढलं - यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !

आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.

मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"

क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे नं, तो सर्वात गरीब आहे. आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो. त्याची स्थिती फार खराब आहे."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
"सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फाटलाय. त्याने शिवलाय; पण फाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पँट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."

मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली. पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........."
वह्यांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......

असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो...... अरेरे!...
मी खूप कमी पडतोय. ज्ञानेश्वर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.

सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत ज्ञानेश्वरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? ज्ञानेश्वर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकले-- 'ज्ञानेश्वर पावसे, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस'.

डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."

मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर- ज्ञानेश्वर पावसेच आहे!"

एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. ज्ञानेश्वरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.

दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला.

त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... "सर, रागवू नका; पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका."अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?"चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव... !!"

त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी...... मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा..... ?

"सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."

त्याची रफू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.

"अरे पण.... ?"

"सर,विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."

अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, "ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"

"सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंडहँड वापरतोय... खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?
सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर... सर,सांगा ना, मी गरीब कसा?"

ज्ञानेश्वर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.

"खरंय ज्ञानेश्वर. पण तुला या पैशाने मदतच......."

"सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फी देतीये म्हटल्यावर, मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "

"म्हणजे?"

"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. कॉन्ट्रेक्टर बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...

मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....
म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु. ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........ सर, आहे ना मी श्रीमंत?"

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्याऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?"

"सर, तेवढी फुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो."

अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.

"ज्ञानेश्वर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."

"म्हणूनच म्हणतो सर...... !"

"हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."

"सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाऊ द्या. मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं, हेलन केलर, विवेकानंद, आइन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर..... प्लीज..... !"

वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परिश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!

====================
लेख एकदम मस्त, छान आहे. प्रत्येक पालकाने घरी आपल्या मुलांना मुद्दाम वाचून दाखवावा...
👌👌👌