* कोणी म्हणेल की *
कोणी म्हणेल की , मी हरलो कसा इथे . .
तेव्हा जगास सांगा , लढलो कसा इथे !
बांधा खुशाल , माझ्या घरटी उरावरी
कोणास काय चिंता . . रुजलो कसा इथे !
मी पेटलो असा की , वणवाच पेटला !
आकाश फक्त जाणे, विझलो कसा इथे !
मी हासताच फुलल्या सुतकातही कळ्या . .
बागेस ह्या विचारा, हसलो कसा इथे !
ते खोड चंदनाचे झिजले नि संपले . .
गंधात पण पहा ना , उरलो कसा इथे !
अनामिक
No comments:
Post a Comment