।। मनं की बातं ।।
ईकास ईकास म्हणत्यात
ते काय असते भाऊ ।
अच्छे दिनाचे गाणे
किती दिवस गाऊ ।।
परत्येक गाव म्हणे
ईस्मार्ट सिटी व्हणार ।
ईज ,रस्ता, पाणी
कवां अम्हाले देणार ?
मनं की बात ऐकु ऐकु
पिकले भावा कान ।
सांगा शेतकऱ्यांकडे तुमी
कवा देणार ध्यान ?
मेक ईन चा नारा
रोजच देतात तुमी ।
कधी सिकवालं आम्हाले
कसं बनवता तुमी ? ।।
बनवायचं कसं हे
तुमच्या कडून शिकावं
राती पडलेलं सपनं सुदा
अच्छे दिन म्हणून ईकावं ।
सपन पाहून पाहून माहे
डोये गेले थकुनं ।
तुमी घेतली खुर्ची राजा
काही बाही फेकुनं ।।
सबका ईकास कसा
अन् कसी सबकी साथ ?
सारी बोलाचीच कढी
अन् बोलाचाच भात ।।
कवी - सचिन चौकसकर
मो -9767768016
मंठा .जि.जालना.
No comments:
Post a Comment