बाई आहेस तू
बाईसारख रहायच,
जग बदललं , विज्ञानाने प्रगती केली
गेलीस तू अंतराळात
पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून. ..
गाठलास तू तळ त्या अथांग सागराचा
न्यायालयात न्यायदान तर
पोलीस दलात योगदान.
झालीस तू मोठ्या वित्त कंपनीची CEO.
झालीस राष्ट्रपती, पंतप्रधान अन्
दाखवलस आपल्या राजकीय शक्तीच विराट रूप...
अन् दुसरीकडे
दारुड्या नव-याचा मार सहन करत
लेकरांच्या भल्यासाठी ओढतियेस
संसाराचा गाडा ....
रस्त्यावरची खडी फोडताना
झाडाला बांधलेल्या झोळी बरोबर
तुझाही जीव टांगलेला असतो.
घरी गेल्यावर नवऱ्याला मिळते
मोकळीक. पण तू. ...
चूलीला जाळ घालताना झालेल्या
धूराने डोळे जातात भरून पण
कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी निमूट सहन करतेस
विना तक्रार. ..
व्यवस्थेच्या अन्यायी बेड्या तोडून
स्त्री शिक्षिका झालीस तू...
वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला तू...
शेती पिकवून कृषी कन्या झालीस तू
शास्त्रज्ञ होवून शोध लावलेस तू
रणांगणात लढलीस तू
संकटांना भिडलीस तू.
तरीही
तुझ्या अफाट शक्ती बद्दल अनभिज्ञ राहिलीस तू...
सांग ना पुरूषांनी वाहीला असता का भार.?
केली असती का आई वडील सोडून
सासू सास-याची सेवा ?
काढली असती का लहान मुलांची
दुखणी खुपणी ?
खाल्ला असता का मार पिवून आलेल्या बायकोचा ?
नाही ना. .?
म्हणून
हीच स्त्रीशक्ती आपल्याला डोईजड होईल
हे ओळखून व्यवस्था जागी झाली,
आणि मग तिने निर्माण केले नवीन
नियम. .....स्त्रियांसाठी.
तिने घर सांभाळायचे,
पतीला परमेश्वर मानायचे,
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही ,
शिक्षण घ्यायचे नाही ,
पुनर्विवाह करायचा नाही ,
केशवपन करायच,
घरात महत्वाचे निर्णय घ्यायचे नाहीत.
( म्हणजे अक्कल चालवायची नाही )
तरीही तू गेलीस शनीच्या चबूतऱ्यावर...
पण आता...
स्त्रियांना निषिद्ध असणाऱ्या मंदिरांचा तूच निषेध कर...
नको टाकूस पाऊल तिथे
जिथे तुझं माणूसपण नाकारलं जातय.
अशा दगडांच्या देवाजवळ जाण्यासाठी भांडण्यापेक्षा
दीनदुबळ्यांमध्ये देव शोध.
आदिवास्यांचे प्रश्न, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, भूकबळींचे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्त्येचा प्रश्न, पर्यावरण -हासाचा प्रश्न
असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तुझी शक्ती खर्ची घाल.
कर मात सर्व संकटांवर
भेदभाव जोपासणाऱ्या संस्कृतीवर!
अन् धाडसाने
हो स्वार त्या पुरुषसत्ताक संस्कृतीवर!!!
(Collected) (^m^) (^j^) (मनोगते)
@@@@@@@@@@@@@@@@@@
No comments:
Post a Comment