Sunday, 28 February 2016

लीपदिन

लीपदिन

पृथ्वी सूर्याभवती एक फेरी ३६५ दिवसात पुर्ण करते म्हणुन ह्या गतीला वार्षिक गती म्हणतात . ह्या कालावधीला वर्ष असे म्हणतो ,मात्र प्रत्यक्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला 365.242199 दिवस म्हणजेच ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट  लागतात  . म्हणजे ३६५ दिवसांचा वर्ष मोजल्यानंतर ही जवळजवळ ६ तास शिल्लक राहतात . हे सहा तास दरवर्षी जास्तीचे जमा झाल्यास दर चार वर्षानी १ दिवस वाढतो . हा दिवस त्या वर्षात अधिकचा दिवस असतो . म्हणजे दर चार वर्षानी ३६६ दिवसांचा वर्ष येतो . व हा अधिकचा दिवस फेब्रुवारी महिण्यात धरला जातो .  फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असतो मात्र दर चार वर्षानी तो २९ दिवसांचा असतो . यालाच आपण लीपदिन व ह्या वर्षाला लीपवर्ष म्हणतो .

दोन हजार वर्षापुर्वी ज्युलियस सिझर ह्या रोमन सम्राटाने लीपवर्षाचा प्रारंभ केला .  ज्या वर्षाला ४ ने भाग जातो अशा वर्षी लीप वर्ष साजरा केला जातो . मात्र असे दरवेळेस करत गेलो तर दर १०० वर्षानी पुन्हा अडचण निर्माण होते कारण वर आपण पाहिले आहे की दरवर्षी ५ तास ४८ मिनिट जास्त होतात आणि आपण गणितात तर पुर्ण ६ तास पकडले आहेत . त्यामुळेच हे दरवर्षीचे  १२ मिनिट सामावुन घेण्यासाठी दर १०० वर्षात २५ अधिकचे (लीप ) दिवस न घेता २४ घेतले जातात व शतकाच्या शेवटच्या वर्षी लीपवर्ष धरला जात नाही .त्यामुळेच सन  १८०० ,१९०० , हे लीपवर्ष नव्हते . हे असे करुनही परिवलन व वर्ष यांचे भाग नि:शेष होत नसल्याने पुन्हा ४०० वर्षानी एक दिवस अधिकचा घ्यावा लागतो व हे गणित पुर्ण होते .

म्हणजे
दर चार वर्षानी लीप वर्ष येते. ज्या सालाला  ४ ने भाग जातो ते वर्ष लीपवर्ष मानले जाते .
शतकाच्या शेवटच्या सालाला ४०० ने भाग जात असल्यासच लीप वर्ष मानले जाते उदा .२०००, हे वर्ष लीप वर्ष होते .

२९ फेब्रुवारी ला जन्मलेल्या मुलांना लिपर्स किंवा लिप्लिंग असे म्हणतात त्यांचे वाढदिवस दर चार वर्षानी येत असले तरी मात्र ते  २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च ला वाढदिवस साजरा करतात .

Saturday, 27 February 2016

Who Is Indian

I crossed my street, they asked my caste.

I crossed my district,  they asked my religion.

I crossed my state, they asked my language.

I became Indian only after I crossed my country. ....😔😢
A silent, but very strong message... think about it.

Friday, 19 February 2016

विनवणी गुरुजींची

मास्तर, गुरुजी संपवून,
शब्द-अक्षरांनाही यांनी डांबलं,
उंदीर-मांजरे मोजायला लावून
बालकांचं शिक्षण थांबलं!

कुटूंब नियोजनाचे धडे
गुरुजींनी घरोघरी पेरले
जनगणनेसाठी गुरुजींना
शासनाने वरले!

हागणदारी मुक्तीसाठीही
गुरुजीच त्यांना दिसला
हे काय काम गुरूजींना?
अडाणी बाप हसला!

लबाडांच्या लोकशाहीत
निवडणुक कामाचा भार
शाळा राह्यल्या मोकळ्या
मुलं झाली निराधार!

पुढे स्वयंपाक घरही
आमच्या शाळेला जोडले
पोषण आहार हिशेबासाठी
गुरुजींनी
फळ्यावरचे गणित खोडले!

बांधकामाचा हिशेबही
पुढे गुरूजींकडे आला
उरला-सुरला गुरूजी
असा 'बिल्डर ' झाला!

कधी प्रगणक झाला
तर कधी झाला BLO
गुरुजींच्या विविध भूमिकेत
मुलं झाली LOW!

अशा या online च्या गर्तेत
बुद्धीवान गुरूजी फसला
सोडून मुले वा-यावर
कॉम्प्युटरमध्ये बसला!

आज नवं आलंय फर्मान.......
म्हणे,
शाळा भरणार आठ तास!
कसलं बालमानसशास्ञ ?
अन कशास हा नवा जाच?

उंदरा-मांजरावरचे प्रयोग
नेहमीच आमच्या मुलांवर झाले
ज्यांचा क्षेञाशी संबंध नाही
ते नवं तत्त्वज्ञान सांगून गेले!

बस करा,.......
थांबवा आता......
मला मुलांनाच शिकवू द्या
शहरासारखं इथंही होईल
मला माझी मराठी शाळा वाचवू द्या!

             . . .संदिप वाघ,जामनेर

!! काहीतरी संपलय !!

मामाचं पत्र हरवलंय की
पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !

     कोंबड्याचं आरवण थांबलंय की
     ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
     एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय
की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

     मऊ वरण-भात करपलाय
     की आमची जीभच करपलीय ?
     एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय
की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय

     आमचं वय वाढलंय
     की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
     एक काहीतरी नक्कीच वाढलंय

शुभं करोति म्हणायचं विसरलोय
की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !
   
                       अनामिक

शिक्षक

क्या करते हो आप ??
शिक्षक का सुन्दर जवाब देखिए-

सुन्दर सुर सजाने को साज बनाता हूँ ।
नौसिखिये परिंदों को बाज बनाता हूँ ।।
चुपचाप सुनता हूँ शिकायतें सबकी ।
तब दुनिया बदलने की आवाज बनाता हूँ ।।

समंदर तो परखता है हौंसले कश्तियों के ।
और मैं डूबती कश्तियों को जहाज बनाता हूँ ।।

बनाए चाहे चांद पे कोई बुर्ज ए खलीफा ।
अरे मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाता हूँ ।।

                माझ्या सर्व शिक्षकांना समर्पीत.

सुज्ञ पालकांसाठी

      पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा - ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’
सगळे हात वर होतात.

असं विचारलं की - ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’
तरी सगळे हात वर.

मी आणखी एक प्रश्न विचारते -
‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’
बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही.

मग विचारावं की - ठीक आहे.
आता दुसरा प्रश्न विचारते -
'असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं, आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’
पुन्हा एकही हात वर होत नाही.

पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं.
रडू येतं. मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’

एकदा असं झालं की, पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला.
ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’

मला फार नवल वाटलं.
मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का?
आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’

ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले, 'ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’
...आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले.

आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’

पुन्हा मोठा हशा झाला.

क्वचित काही पालक भेटतात न मारणारे.
आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’

कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’

काही असं सांगतात की, ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’

मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’

पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं!’

असं आपण जेव्हा म्हणतो की, 'आम्हाला राग आवरत नाही.'

तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण?

एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर?
तर लगेच आपण राग आवरतो.

मग एखाद्या छोट्या मुलीला मी माइकपाशी बोलावते.
तिला विचारते, 'अगदी सोपा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’
ती 'हो' म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो.
मग मी तिला म्हणते, 'समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत-धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’

अर्धा मिनिट ती विचार करते आणि म्हणते, ''आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, 'दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.''

सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘छान उत्तर दिलंस.'

आता दुसरा सोपा प्रश्न.
'समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत-धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’

मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो.
ती म्हणते, ‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, 'मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’

पालक पुन्हा जोरदार हसतात.
मुलीला मी शाबासकी देते.
छोटं बक्षीस देते.

आपलं असं ठरलेलंच असतं की,
'चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठ्या माणसांना मात्र माफ.
जो आपल्याला उलट मारू शकतो, त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?'

मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं.
‘आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.'

'आज आईने मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.'

आज दोघं मला खूप रागावले.
मला असं वाटतंय की, 'जगात माझं कुणीच नाही.'

इतकं जर मुलांना वाईट वाटतं,
तर का मारायचं मुलांना?

'छडी लागे छम-छम’वर अनेक पालकांचा विश्वास असतो.
'मारलं नाही तर मुलं बिघडतात' अशी त्यांच्या मनात भीती असते.

काही पालक तर हमखास असं सांगतात, 'मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो.'

मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.'

पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं?
कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत.
सर्वांच्या तब्बेती उत्तम आहेत.
पैशाचा काही प्रश्न नाही.
घरात काही भांडण नाही.
अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.'

आणि याऐवजी,
'समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पैशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे.
अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही.
त्याला मार तर बसतोच,
वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात.
हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो.
अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते.
आवडीच्या गोष्टी घडल्या तर, पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.

तेव्हा एक लक्षात ठेवायचं -
'मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत,
तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, 'याची जरूर आहे का?'

९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल -
'जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.'

तेव्हा प्रश्न संयमाचा आहे.
'मारणं' हा आपला शॉर्टकट असतो.
खरं तर,
कोण समजावून सांगत बसणार?
घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात.
वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे.
...आणि मुलं इतकी चिवट असतात की, ती आपला अंत पाहतात.
खरंच आहे. तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत.
तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.

मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल.
रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा.
त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा.
आणि त्याला हे सांगा की, 'आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, 'मला अमूक पाहिजे म्हणून' आणि 'रडायला लागलास' ते मला आवडलं नाही.
किती खेळणी आहेत तुझ्याकडे !
तरी हट्ट करायचा का?
मूल पण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते.
तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी.
कधी नाही मिळालं तर हट्ट करू नये.
तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला/तिला पटवून द्या.
हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं.
आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही.
त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.

'पालकत्वाची सत्ता' ही न वापरण्यासाठी असते.
ती चांगल्यासाठी जरूर वापरावी.
...पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये.

प्रश्न अनुत्तरीत

अंधविश्वासाची झापडं उघडणारच नसतील तर मग शिकायचं कशासाठी....?

प्रश्न
1 - रावणाला जर 10 तोंडे होती तर
1) मुख्य तोंड डावीकडून कितव्या क्रमांकावर होते ?
2) त्याच्या मुलाला एकच तोंड का होते?
3) एकाच मानेवर 10 तोंडांना आधार कसा होता ?
4) कान किती व कसे होते ?
5) दहा तोंडांची सेवा 24 तास होती की फक्त कधीकधीच ?

प्रश्न 2 - तुळशीचे झाड जर देवाशी दरवर्षी लग्न करू शकते तर बाभळीचे झाड माझ्याशी एकदातरी लग्न करू शकेल का ?

प्रश्न 3 - योग्य क्रम लावा.
पृथ्वी नागाच्या डोक्यावर,
        नाग समुद्रात,
       समुद्र पृथ्वीवर

प्रश्न 4 - कुंभकर्ण जेवण केल्यावर 6 महीने जर झोपत असेल तर प्रातःविधीला कधी जात असेल ?

प्रश्न 5 - असं म्हणतात की, ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे त्यात मग सर्व जग आलं, सगळे प्रांत सगळे देश आलेत मग.......३३ कोटी देव इतर कोणत्याही देशात न राहाता आपल्या भारतातचं का राहतात ?

प्रश्न 6 - राम जर सर्व शक्तिमान होता तर त्याला आपली बायको स्वतः का शोधता आली नाही ?

प्रश्न 7 - हनुमानाने जर डोंगर उचलुन आणला होता तर त्याच डोंगरा वर सैन्या का नेल नाही ?

प्रश्न 8 - रामाने बाण काढताच समुद्राने घाबरून सेतू बांधायला रस्ता दिला मग......सेतु बांधायचा ताप बिचार्या माकडांना का दिला ?

प्रश्न 9 - बायका चंद्राला भाऊ मानतात मग...
1) वहीनी कोणती ?
2) भाऊ च का मानतात ?
3) आजीचाही भाऊच,
     आईचाही भाऊच,
     मुलीचाही भाऊच,
     मुलीच्या मुलीचाही भाऊच......
काय नाते आहे की बनवाबनवी आहे ?

🚦काय गडबड आहे

▶ प्रत्येक धर्मात स्वर्ग, नरक ह्या कल्पना आहेत. किती मस्त कल्पना आहेत ना स्वर्ग, नरक, आत्मा. माणुस मेला की त्याच्या शरीरातुन त्याचा आत्मा बाहेर पडतो, नंतर त्याचा आत्मा इतर धर्मांचं माहिती नाहीये पण हिंदू धर्मातल्या गरुडपुराणानुसार मृत्युलोकात जातो मग पापं केली असतील तर नरकात शिक्षा दिल्या जातात, पुण्य केली असतील तर स्वर्गात जातो, स्वर्गात अप्सरा असतात, पाहीजे ते भोजन असतं, नंतर अप्सरा नृत्य करतात, सगळा आनंद आपला आत्मा घेतो, नरकात तर यापेक्षा भयानक हाल, गरम तेलात आत्मा तळला जातो, चाबकाने आत्मा फोडला जातो, तेलाचे घाणे फिरवले जातात.

▶ मजेची गोष्ट अशी की गीतेत लिहीलंय....आत्मा ना शस्त्राने कापला जाउ शकत, ना तो जळु शकतो, ना तो नष्ट होउ शकतो.

▶ मग प्रश्न पडतो कि, आत्म्याला चाबकाने फोडलं कसं जाउ शकतं, किंवा आत्म्याला शिक्षा कशी दिली जाउ शकते, विचार करा जरा.....

▶ बरं तेही जाउ द्या, सांगितलं जातं की मेलेला माणुस परत येउ शकत नाही, आणि विज्ञानाच्या दृष्टीने ते सत्य ही आहे,
      मग कुणी स्वर्गाचं किंवा नरकाचं वर्णन हुबेहुब कसं केल....?

▶ कारण स्वर्गात किवा नरकात जाण्यासाठी मरावं लागतं,
   मग असा कोण महाशय आहे की तो मरुन परत
आला आणि हे  लिहुन गेला....?

▶ म्हणजे मृत्त्यू ह्या अंतिम सत्त्याला ही हुलकावणी देणारे कुणीतरी होते की काय....?

▶ वैज्ञानिक दृष्टीने चिकीत्सा केली तर लक्षात येते की आत्मा असा काही प्रकारच अस्तित्वात नाहीये, आणि हे खरंही आहे कारण मी तरी नाही पाहिला अजुन आत्मा बित्मा, किंवा अनुभव ही नाही आला मला. माणुस मेल्यानंतर त्याच्या शरिरातील पेशी मरतात तेव्हा मनुष्य मेला आहे असं घोषित होतं, माणसाने हालचाल केली की त्याच्या शरिरात आत्मा असतो, पण विज्ञान म्हणते की मानवाच्या शरिराची हालचाल त्याच्या शरिरातील पेश्यांच्या सक्रियतेने होते, म्हणुन ही कदाचित माणसाचा जीव हळुहळू जातो, आणि तेव्हा त्याला वाटतं की त्याला यमदूत घ्यायला आलाय कारण अश्या वेळेस मानवाच्या पेश्या जेव्हा कमजोर होतात तेव्हा त्याचा मेंदु त्याला या घटना दाखवतो, जसं की दिवसभर विचार केल्यावर रात्री तेच विचार स्वप्नात येतात, मरताना ही माणुस हाच विचार करत असतो की तो स्वर्गात जाणार की नरकात, यम त्याला कधी घ्यायला येईल आणि त्याचा मेंदु तेच चित्र त्याला दाखवतो, मग आता प्रश्न हा पडतो की आत्मा, स्वर्ग, नरक ह्या कल्पना कुठून आल्यात....?

▶ पहिलं कारण आहे भय पसरवणे

▶ दुसरं म्हणजे त्याच भयाचं रुपांतर धंद्यात करण्याचं

▶ बघा ना आता....ज्या पालकांना आपण जीवंतपणी चांगलं खाउ घालत नाही किंवा त्यांच्यावर खर्च करत नाहीत त्यांच्या मरण्यानंतर, दहावं, बारावं, तेरावं, महिना, वर्षश्राद्ध, नंतर पिंडदान.

▶ आत्मा भटकता असेल तर नारायण नागबली, अमुक पुजा, तमुक पुजा, त्यांचा खर्च हा कुणाच्या खिशात, कुठे जातो....?

▶ अंधविश्वासाची झापडं उघडणारच नसतील तर मग शिकायचं कशासाठी....?

▶ भाताचे गोळे करुन आत्म्याला खाउ घातलं जातं, किती तरी भात असाच नष्ट होतो, अंधश्रध्देच्या आहारी जाउन मेलेल्यांना खाउ घालतो आणि जिवंत असलेल्यांना दारातून हुसकुन देतो.

याचा कधी डोळसपणे विचार केलाय का, ह्या सगळ्या कल्पना  नाहीतर मग काय आहे....?

असो
आतातरी......
बदला......
विचार तरी करा.

                           डाँ .नरेद्र दाभोळकर.

माणूसकी

एक खेल का मैदान,
आठ लडकियाँ रेस लगाने
के लिए खड़ी हैं..

Ready
Steady

और धायँ..

पिस्तौल की आवाज़ के साथ
ही आठों लडकियां दौड़
पड़ती हैं..

सभी लड़कीया 5 या 6 मीटर आगे गयी होंगी की
एक लड़की फिसल कर गिर जाती है और उसे
चोट लग जाती है..

दर्द के मारे वह लड़की रोने लगती है, बाकि की सातों लड़कियों को उसके रोने
की आवाज़ सुनाई पड़ती है..

और ये क्या ..??

अचानक वो सातों लडकियाँ रुक जाती हैं, एक पल के लिए वो सभी एक दुसरे को देखती हैं और सातों वापस उस घायल लड़की की तरफ दौड़
पड़ती हैं..

मैदान में सन्नाटा छा गया,
आयोजक परेशान,
अधिकारी हैरान !
तभी एक अप्रत्याशित घटना घटती है

वो सातों लडकियाँ अपनी घायल प्रतिभागी को उठा लेती हैं, और फिर चल पड़ती हैं उस तरफ जहाँ जीत की रेखा खीची गयी है..

एक साथ आठों लडकियाँ उस जीत की रेखा पर पहुँच
जाती है..

ये क्या लोगों की आँखों में आँसूं ?

क्यों ?

किसलिए ?

मित्रों ये रेस
NATIONAL INSTITUTE OF MENTAL HEALTH
द्वारा आयोजित थी और वो आठों लडकियां मानसिक रूप से बीमार थी..

लेकिन जो इंसानियत
जो मानवता,
जो प्यार,
जो Sportsman Ship,
जो Team Work,
जो समानता का भाव..

उन आठों ने दिखाया
वो शायद हम जैसे मानसिक रूप से विकसित और
पूर्ण रूप से ठीक नही दिखा पाते..

क्योंकि,

हमारे पास दिमाग है उनके पास नही था,

हमारे पास ईगो है उनके पास नही था,

हमारे पास Attitude है उनके पास नही था..

मित्रों,
प्यार इंसान से करो उसकी औकात से नही,
रूठो उनकी बातों से उनसे नही,
भूलो उनकी गलतियों को उनको नही,
रिश्तों से बढकर कर कुछ भी नही,

अगर दोस्त न मिलते तो ये कभी समझ नही आता,
की अजनबी लोग भी अपनों से
ही नही अपनी जान से
भी प्यारे हो सकते हैं |

Saturday, 13 February 2016

असच काहीतरी

खुश हूं 
"जिंदगी है छोटी,"
हर पल में खुश हूं
"काम में खुश हूं,"
आराम में खुश हू  
"आज पनीर नहीं,"
दाल में ही खुश हूं
"आज गाड़ी नहीं,"
पैदल ही खुश हूं  
"अगर किसी का साथ नहीं,"
तो अकेला ही खुश हूं...   
.  . आज कोई नाराज है,
उसके इस अंदाज से ही खुश हूं  
जिस को देख नहीं सकता...☺
उसकी आवाज से ही खुश हूं 

"जिसको पा नहीं सकता,"..
उसको सोच कर ही खुश हूं...
"बीता हुआ कल जा चुका है,"
उसकी मीठी याद में ही खुश हूं...
आने वाले कल का पता नहीं,"
इंतजार में ही खुश हूं  
"हंसता हुआ बीत रहा है पल,"
आज में ही खुश हूं
"जिंदगी है छोटी,"
हर पल में खुश हूं  
"अगर दिल को छुआ,
तो जवाब देना"
"वरना बिना जवाब के भी खुश हूं...

पाणी

एकमेकांची जिरवण्या पेक्षा जर
आपण पावसाचं पाणी जिरवलं असतं तर
कदाचित आज दुष्काळाच्या झळा साेसाव्या लागल्या नसत्या....!!!