Sunday, 20 March 2016
Thursday, 17 March 2016
कल्पना चावला
डॉ.कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ मध्ये आपल्या नाशिक मध्ये सुद्धा काही खगोलप्रेमी तरुणांनी एकत्र येवून 'कल्पना युथ फाउंडेशन' या नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे. नवीन अंतराळ मोहिमांबद्दल माहिती देणे, शाळा कॉलेजेस यांमधून व्याख्यान आणि प्रस्तुतीकरण करणे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. दुर्बीण बनविणे, विविध स्पेस क्राफ्टची मॉडेल्स बनविणे, अंतराळ विज्ञानासंबंधीच्या विषयांवर निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेणे, पॉवर पॉइंट स्पर्धा घेणे, आकाशदर्शन करवून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अकाशाबद्दल कुतूहल तयार करणे अशी विविध कामे करते. युनोच्या आशिया पॅसिफिकच्या अंतराळ शिक्षणाच्या राजदूत अपूर्वा जाखडी ह्या या संस्थेच्या मुख्य सल्लागार असून प्रोफेसर जयदीप शहा, प्रोफेसर भूषण उगले, पवन कदम, हेमंत आढाव, सुशांत राजोळे, विजय वैशंपायन, सारंग शाह, केतकी, मयुरी, दिपक तरवडे, दिपक सोनवणे, सुधाकर नागरगोजे, धनंजय लाखी हे काम बघतात. तसेच संस्थेची www.kalpanayf.org या नावाने वेबसाईट देखील आहे. तसेच फेसबुकवर देखीलआहे 'कल्पना वाय एफ' या नावाने पेज देखील आहे.
Wednesday, 16 March 2016
कोणी म्हणेल की
* कोणी म्हणेल की *
कोणी म्हणेल की , मी हरलो कसा इथे . .
तेव्हा जगास सांगा , लढलो कसा इथे !
बांधा खुशाल , माझ्या घरटी उरावरी
कोणास काय चिंता . . रुजलो कसा इथे !
मी पेटलो असा की , वणवाच पेटला !
आकाश फक्त जाणे, विझलो कसा इथे !
मी हासताच फुलल्या सुतकातही कळ्या . .
बागेस ह्या विचारा, हसलो कसा इथे !
ते खोड चंदनाचे झिजले नि संपले . .
गंधात पण पहा ना , उरलो कसा इथे !
अनामिक
Tuesday, 15 March 2016
Friday, 11 March 2016
Thursday, 10 March 2016
बिक न जाए |
बिक न जाए ,
बिक रहा है पानी,
पवन बिक न जाए ,
बिक गयी है धरती,
गगन बिक न जाए
चाँद पर भी बिकने लगी है जमीं .,
डर है की सूरज की तपन बिक न जाए ,
हर जगह बिकने लगी है स्वार्थ नीति,
डर है की कहीं जमीर बिक न जाए ,
देकर दहॆज ख़रीदा गया है अब दुल्हे को ,
कही उसी के हाथों दुल्हन बिक न जाए ,
हर काम की रिश्वत ले रहे अब ये नेता ,
कही इन्ही के हाथों वतन बिक न जाए ,
सरे आम बिकने लगे अब तो सांसद ,
डर है की कहीं संसद भवन बिक न जाए ,
आदमी मरा तो भी आँखें खुली हुई हैं
डरता है मुर्दा , कहीं कफ़न बिक न जाए।…..
तुम्ही मरताय हळूहळू!
तुम्ही मरताय हळूहळू!
तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!
स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!
सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!
छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!
या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!
Tuesday, 8 March 2016
काय माहित
आज महिला "दिनी" सुद्धा महिला "दीन" आहे. हा "दीन" पणा कोणत्या दिनी जाईल काय माहित.
"All Humans Rights Are Women's Rights"
हे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवने आज अभिप्रेत आहे.
तुम्हाला काय वाटत.
श्रीमंत विद्यार्थी.......
शाळेने पत्रक काढलं - यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे नं, तो सर्वात गरीब आहे. आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो. त्याची स्थिती फार खराब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
"सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फाटलाय. त्याने शिवलाय; पण फाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पँट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली. पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........."
वह्यांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......
असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो...... अरेरे!...
मी खूप कमी पडतोय. ज्ञानेश्वर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत ज्ञानेश्वरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? ज्ञानेश्वर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकले-- 'ज्ञानेश्वर पावसे, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस'.
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर- ज्ञानेश्वर पावसेच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. ज्ञानेश्वरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला.
त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... "सर, रागवू नका; पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका."अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?"चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव... !!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी...... मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा..... ?
"सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण.... ?"
"सर,विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, "ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंडहँड वापरतोय... खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?
सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर... सर,सांगा ना, मी गरीब कसा?"
ज्ञानेश्वर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरंय ज्ञानेश्वर. पण तुला या पैशाने मदतच......."
"सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फी देतीये म्हटल्यावर, मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. कॉन्ट्रेक्टर बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...
मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....
म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु. ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........ सर, आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्याऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?"
"सर, तेवढी फुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो."
अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
"ज्ञानेश्वर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."
"म्हणूनच म्हणतो सर...... !"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
"सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाऊ द्या. मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं, हेलन केलर, विवेकानंद, आइन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर..... प्लीज..... !"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परिश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!
====================
लेख एकदम मस्त, छान आहे. प्रत्येक पालकाने घरी आपल्या मुलांना मुद्दाम वाचून दाखवावा...
👌👌👌
कहानी ८ मार्चची....महिलांच्या संघर्षाची!!
जागतिक महिला दिन हा कष्टकरी महिलांचा व महिलांच्या संघर्षाचा मान म्हणून जगभर साजरा केला जातो.
कामगारांना अत्यंत घाणेरड्या परिस्थितीत आठवडाभर एकही सुट्टी न घेता १६-१६ तास काम करायला लागायचे..अशा भयानक परिस्थितीसोबतच महिलांना भेदभावालाही सामोरे जावे लागायचे...
८ मार्च १८५७ ला १० तास काम, कामाची परिस्थिती सुधारली पाहिजे, महिलांना समान अधिकार ह्या मागण्यांसाठी न्यूयॉर्क इथे कापड गिरण्यात महिला कामगार पहिल्या प्रथम लढा करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या.
त्यांचा लढा सशस्त्र पोलीस, घोडेस्वार वगैरेंच्या मदतीने भांडवलदारांनी मोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु लढयाचे हे
लोण अमेरिकेतच नव्हे तर युरोपमध्ये देखील पसरले.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण.
या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.
दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती.
अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली.
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.
दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.
अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
८ मार्च २०१६ ह्या वर्षीची थीम आहे
' समानतेसाठी प्रतिज्ञा '
ह्या ऐतिहासिक दिनाला "महिलांचे लाड करणे दिन" किंवा "खरेदी करणे दिन" असे स्वरूप न देता, स्वत: समानतेकडे वाटचाल करत संघर्षाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा....
आंतराष्ट्रीय महिला दिन...
"जगातील प्रतिगामी शक्तींच्या हल्ल्याविरूध्द जगातील सर्व स्ञियांची एकजूटीची आघाडी झाली पाहीजे" असे ठरवून 8 मार्च 1910 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आले. डेन्मार्क देशातील कोपन हेगन शहरात क्लारा झेटकीन यांनी सुचना केली की, जगातील सर्व स्ञियांनी आपल्या हक्कासाठी व लढण्यासाठी एक दिवस ठरवावा व आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून तो जगभर पाळावा.स्ञियांच्या आंतरराष्ट्रीय एकजूटीची व संघर्षाची दिन पाळण्याची ठराव सर्वांनी मंजूर केला. 8 मार्च हा दिवस ठरविण्याचे कारण म्हणजे 1857 साली याच दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील शिलाई काम करणार्या स्ञियांचा भयानक पिळवणूकी विरुद्ध मोठा संप होऊन निदर्शने झाली. त्यावेळी स्ञियांवर जबर दडपशाही झाली या लढ्याला जगभर फार पाठिंबा मिळाला.त्याची आठवण म्हणून 8 मार्च हाच आंतरराष्ट्रीय महिला दिन ठरविण्यात आला.
Saturday, 5 March 2016
असे जगावे दुनियेमध्ये..
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...
Friday, 4 March 2016
!! प्रगत भारत !!
!! प्रगत भारत !!
विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणसाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला“ मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामधे कमीपणा तर वाटत नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्दा आपल्या जंगलाला एवढी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच प्रॉब्लेम्स आहेत तसे आमच्या देशात पण आहेत म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा कां?” हा अमेरीकन माणुस स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.
अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चूक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता पण या देशांना स्वातंत्र्य मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त 68 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रिटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो पण अनुभव नसताना सुध्दा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदलते( युरो आता आहे पण तरीही आर्थिक फरक आहेच). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या द्दृष्टिने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक प्रसीध्ध सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणुनच प्रसिध्द आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “ भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लागला, ती सगळी संकटे“एकमेवद्वि
तीय ( Unique )आहेत. जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मिळणार नाहीत. भारतियांनाच या समस्यांवर तोडगा शोधून काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामध्ये यशस्वी होतील. एवढे असुनही भारताने जी प्रगती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात. असाच एक अमेरीकन इंजिनीयर भेटला. तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना आहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबून आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबून असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकीच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणुन नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहून कायदे कानून पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणा पासुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नागरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दामच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हणून. नुकताच आपण ६७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला
त्यानिमित्त आपण आपल्या देशावीषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरीचे आहे.
१. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे.
२. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची, बेशिस्त वागण्याची,वाहतु
कीचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उध्दटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार?
३. आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येईल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार ? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
४. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी,जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर,ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रगती केली आहे त्यात तिथल्या जनतेचा फार मोठा वाटा आहे आणि प्रत्येकवेळा ते सरकारवर अवलंबून राहिलेले नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण ? ते कोणी परग्रहावरुन आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.
चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करुया! !
शुभेच्छा !...